@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Due to DA exceeding 50 percent, house rent allowance has been sanctioned at increased rates of 30 percent, 20 percent and 10 percent. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3 टक्केची वाढ लागु केल्याच्या नंतर डी.ए ची मर्यादा ही 50 टक्के पेक्षा अधिक झालेली आहे .
वित्त विभागाच्या दिनांक 05 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या तरतुदीनुसार राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात येणार आहे . सदर निर्णयांमध्ये डी.ए वाढीची मर्यादा नुसार घरभाडे भत्ता मध्ये वाढ निश्चित करण्यात आलेली आहे .
शासन निर्णयातील स्पष्टीकरण : सदर शासन निर्णयांमध्ये स्पष्ट केले आहे कि , ज्यावेळी 7 व्या वेतन आयोगानुसार डी.ए चे दर 50 टक्क्यांची मर्यादा पेक्षा अधिक होईल , त्यावेळी वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 30 % , 20 % , 10 % अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा असे नमुद करण्यात आलेले आहेत .
म्हणजेच सदर निर्णयाच्या आधारे घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करुन माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनासोबत वाढीव डी.ए सह वाढीव घरभाडे भत्ताचा लाभ घेवू शकता . तसेच दिनांक 01.07.2024 पासुनचे घरभाडे भत्ता फरक देखिल घेवू शकता .
यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता , महागाई भत्ता थकबाकीसह वाढीव दर लागु झाल्याने , एकुण वेतनात मोठी वाढ दिसून येणार आहे .


आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
- महाराष्ट्र राज्य शासनामार्फत खास शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात ह्या महत्वपुर्ण योजना 2025
- आठवा वेतन आयोग व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी ; जाणून घ्या काही महत्वपुर्ण बाबी !