छत्रपती संभाजीनगर व धाराशिव जिल्ह्याच्या नामांतरणावर हायकोर्टाचा शिक्कामोर्तब !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी ; उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलुन धाराशिव व औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलुन छत्रपती संभाजीनगर केल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास तेथिल स्थानिक रहिवाश्यांकडून मुंबई उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती , सदर याचिकेस उच्च न्यायालयांकडून स्थिगिती देण्यात आलेली आहे .

या याचिकेवर निर्णय देणे उच्च न्यायालयांकडून माहे ऑक्टोंबर 2024 पासुन राखुन ठेवण्यात आलेले होते , अखेर आज दिनांक 8 मे 2024 साली याचिका मुंबई उच्च न्यायालयांकडून फेटाळण्यात आली आहे . यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने नामांतरणाचा घेण्यात आलेला निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे .

परंतु याचिका कर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयाची धाव घेणार असल्याचे , माहिती प्रसार माध्यमांशी दिली आहे . या संदर्भातील निर्णय न्यायमुर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्याय.आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठांकडून निकाल राखून ठेवण्यात आलेला होता , सदर दाखल याचिकाच उच्च न्यायालयांकडून फेटाळल्याने , नामांतरणाचे नाव छत्रपती संभाजीनगर व धाराशिव ह्या नावावर अखेरचा शिक्कामोर्तब झाला आहे .

सदर याचिकेवर सुनावणी ही आचार संहिता सुरु असतानाच केल्याने याचिका कर्ते यांच्याकडून थेट न्यायालयांवरच आक्षेप घेण्यात आला आहे . ‍सदरची याचिका ही राजकिय घटनांशी निगडीत असल्याने , निवडणुक काळांमध्ये अशा प्रकारची याचिका फेटाळणे चुकिचे असल्याचे याचिका कर्त्यांचे म्हणणे आहे .

या निर्णयामुळे आता सर्व ठिकाणी नामांतरणाचे नावे वापरण्यास अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे . न्यायालयांमध्ये याचिका दाखल केल्याच्या नंतर नामांतरणाचे नावे वापरण्यास पुर्णपणे सरसकट करता येणार नसल्याचे न्यायालयांकडून नमुद करण्यात आलेले होते , आता आज दिनांक 8 मे रोजी याचिकाच फेटाळली , असल्याने नामांतरणावर अखेरचा शिक्कामोर्तब झाला आहे .

Leave a Comment