@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Gold Price Update News ] : सोन्याच्या भावातील उसळीनंतर , खाली कोसळल्याने , ग्राहकांच्या खरेदीकरीता मोठी झुंबड लागली आहे . चला तर मग 10 ग्रॅमचा सोन्याच्या भावाला किती रुपये मोजावे लागतील , ते पुढीलप्रमाणे सविस्तर पाहूयात ..
मागील आठवड्यापर्यंत सोन्याला प्रति तोळा 71,790/- रुपये इतका भाव होता तर आजच्या दिवशी सोन्याच्या प्रति तोळ्याला 70,900/- रुपये इतका भाव लागल्याने , सोन्याच्या भावांमध्ये कमालीची घसरुन दिसली आहे . सोन्याच्या मार्केटनुसार चांदीला प्रति किलो 81,260/- रुपये भाव सुरु असून , मागील आठवड्यांमध्ये चांदीला 82,450/- रुपये प्रति किलो इतका भाव होता .
सदरचे भाव हे उत्पादन शुल्क , राज्य कर आणि मेकिंग शुल्क यावर आधारीत असतात , सदर बदलानुसार सोन्यातील किंमतीमध्ये बदल दिसून येतो . मुंबई मध्ये सोन्याच्या सर्वात जास्त खरेदी – विक्री होते , या ठिकाणी सोन्याच्या 22 कॅरेटला प्रतितोळा 64,873/- रुपये इतका भाव आहे . तर 24 कॅरेटला 70,770/- रुपये भाव आहे ( प्रति तोळा ) .
सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे भाव ठरले जाते , तर 24 कॅरेट सोन्याची शुद्धता सर्वाधिक असते , तर त्यापाठोपाठ 22 , 21 , 18 व 14 कॅरेट अशी शुद्धताचे प्रमाणे कमी होत जाते . सोन्याची शुद्धता तपासण्याकरीता आता BIS Care App च्या माध्यमातुन सोन्याची शुद्धता तपासु शकता .
परत सोन्याच्या किंमतीमध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण पाहण्यास मिळू असे तज्ञांचे मत आहे , यामुळे सोन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी घटत्या प्रमाणे गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी . असे तज्ञांचे मत आहे .
- शेअर मार्केटमध्ये तेजी कधी येणार ? जाणून घ्या मार्केट तज्ञ , मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ; मार्केट आणखीन घसरण्याचा अंदाज !
- राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..
- पुढील 48 तासात राज्यातील “या” जिह्यात , वाऱ्यासह पावसाची शक्यता !