@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र पोलिस शिपाई या पदांच्या एकुण 17,171 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . तर सदर 17 हजार जागांसाठी 17 लाख 76 हजार इतक्या उमेदवारांनी आवेदन सादर केलेले आहेत . याबाबत पदांनुसार रिक्त्त पदे व प्राप्त आवेदनांची संख्या पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
यांमध्ये पोलिस शिपाई या पदांचा विचार केला असता , पोलिस शिपाई या पदांच्या 9,595 जागेकरीता तब्बल 8.22 लाख आवेदन आलेले आहेत . तर पोलिस चालक या पदांच्या एकुण 1686 जागा रिक्त असून , सदर पदांकरीता तब्बल 1 लाख 98 हजार इतके आवेदन आलेले आहेत .
तर पोलिस बॅण्डसमन या पदांच्या 41 जागेसाठी तब्बल 32,000 इतके आवेदन आलेले आहेत . तर SRPF या पदांच्या 4349 रिक्त जागेकरीता तब्बल 3.50 लाख इतक्या उमेदवारांनी आवेदन सादर केलेले आहेत . तर तुरंग शिपाई पदांच्या 1800 रिक्त जागांसाठी तब्बल 3.72 लाख इतक्या उमेदवारांनी आवेदन सादर केलेले आहेत .
म्हणजेच एका रिक्त पदासाठी 1 : 101 या प्रमाणात उमेदवारांनी आवेदन सादर केलेले आहेत . यावरुन समजते कि , राज्यांमध्ये सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाणे किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे . यांमध्ये उच्च शिक्षित उमेदवारांनी देखिल आवेदन सादर केलेले आहेत , यांमध्ये एम.बी.ए , ए.फील , एम.कॉम , अशा उच्च शिक्षित उमेदवारांनी देखिल मोठ्या प्रमाणात आवेदन सादर केलेले आहेत .
यामुळे यंदाची पोलिस महाभरती करीता उमेदवारांनी अधिकच स्पर्धा करावी लागणार आहे . यांमध्ये ग्रामीण भागातील उमेदवार मोठ्या शर्तीने तयारीला लागले आहेत . यामुळे उमेदवार पोलिस भरती करीता आवेदन सादर केलेल्या उमेदवारांना आता गाफील राहुन चालणार नाही , तर दिवसरात्र एक करुन मेहनत करावी लागणार आहे .
पोलिस भरती मध्ये प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी व त्यानंतर 100 गुणांची लेखी चाचणी होणार आहे . तर अंतिम रित्या लेखी व शारीरिक चाचणीचे गुण ॲड करुन मिरीट यादी लावण्यात येईल .
- शेअर मार्केटमध्ये तेजी कधी येणार ? जाणून घ्या मार्केट तज्ञ , मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ; मार्केट आणखीन घसरण्याचा अंदाज !
- राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..
- पुढील 48 तासात राज्यातील “या” जिह्यात , वाऱ्यासह पावसाची शक्यता !