राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , राज्य मंत्रीमंडळाने दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार कृषी व पदुम विभाग शासन निर्णय 20.02.2024 नुसार राज्यातील कृषी विद्यापीठांमधील अध्यापकीय संवर्ग करीता ..

विहीत करण्यात आलेले सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे हे वय यापुढेही कायम ठेवण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे . सदरचा निर्णय हे राज्यातील तीन कृषी विद्यापीठांतील काही शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांनी वयाची 60 वर्षे पुर्ण केल्याच्या नंतरही मा.उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार ..

आपली कर्तव्ये बजावली आहेत , अशा याचिकाकर्त्यांना त्यांनी प्रत्यक्ष काम केलेल्या कालावधीचे वेतन संबंधित विद्यापीठांनी अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे . तर सदर कर्मचारी त्यांच्या 60 वर्षे नियत वयोमानुनसार निवृत्त झाले आहेत , असे समजुन त्यांना वाढीव कालावधीत काम केल्याचे वेतन देय असेल तसेच ..

कर्मचाऱ्यांच्या खाती अनुज्ञेय रजा शिल्लक असल्यास , त्या कर्मचाऱ्यास अनुज्ञेय रजेचे लाभ देण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच सदर कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय नसल्याने त्यांना वित्त विभागाच्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील तरतुदी लागु राहतील असे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment