@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ mahagai bhatta vadh Shasan Nirnay gr] : केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने महागाई भत्ता (DA) वाढ लागू करणे संदर्भात राज्य सरकार मार्फत निर्गमित करण्यात आलेले सविस्तर शासन निर्णय (GR) खालील प्रमाणे जाणून घेवूयात ..
माहे जुलै 2025 पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA ) मध्ये 03 टक्क्यांची वाढ लागू करण्यात आलेली आहे . ज्यामुळे एकूण महागाई भत्ता हा 55% वरून 58% इतका झाला आहे . या संदर्भात राज्य सरकारकडून निर्गमित शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहेत .
01. शासन निर्णय (सा. प्र. विभाग) : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील अखील भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2025 पासून DA वाढ लागू करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 20.10.2025 रोजी अधिकृत शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे .

02. पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढ : त्याचबरोबर अखिल भारतीय सेवेतील पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना दिनांक 1 जुलै 2025 पासून 58% दराने DA वाढ लागू करण्यात आली आहे .

याच धर्तीवर राज्यातील इतर सर्व राज्य सरकारी कर्मचारी , पेन्शनधारक तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच DA वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे.