@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ 04 major important government decisions were issued on 22.12.2025 regarding state employees.. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.एकीकृत निवृत्तीवेतन ( UPS ) लागु करणेबाबत : महाराष्ट्र संवर्गातील आ.भारतीय सेवा मधील कार्यरत अधिकाऱ्यांना एकीकृत निवृत्तीवेतन योजना ( UPS ) लागु करणेकरीता नविन लेखाशीर्ष उघडण्यास मंजूरी देणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 22.12.2025 रोजी मंजूरी देण्यात आली आहे .
02.आश्वासित प्रगती योजना लाभ : 7 वा वेतन आयोगामध्ये 03 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा प्रथम लाभ मंजुर करणेकरीता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 22.12.2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात आली आहे .
03.जुनी निवृत्तीवेतन योजना : दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरतीची जाहीरात तसेच अधिसुचना निर्गमित झालेल्या तथापि दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत रुजु झालेल्या सरकारी अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन ( Old Pension ) लागु करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
व जुनी निवृत्तीवेतन योजना लागु करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव / पदनाम , मुळ संवर्ग , संस्था / महाविद्यालय , विकल्प अर्ज दिनांक इ. तपशिल यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत .
04.अकार्यात्मक वेतनश्रेणी : कक्ष अधिकारी संवर्गास चार वर्षांच्या नियमित सेवानंतर मंजूर करण्यात येणाऱ्या अकार्यात्मक वेतनश्रेणी मंजूरीकरीता अखंड सेवा ग्राह्य धरण्यास विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक 22.12.2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील चारही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- महसुल विभाग मार्फत 11 मोठे महत्वपुर्ण निर्णय निर्गमित ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !
- माहे डिसेंबर वेतन करीता आनंदाची अपडेट ; GR निर्गमित दि.22.12.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.22.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनाची नविन नियमावली जारी ; जाणुन घ्या सुधारित नियम !
- राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजूरी !