कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !

Spread the love

@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Very important Right to Disconnect Bill 2025 for employees introduced in Lok Sabha ] : कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण राईट टु डिस्कनेक्ट -2025 विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे .

सदर विधेयकानुसार देशातील खाजगी तसचे सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे . त्यांना आपले वैयक्तिक आयुष्य जगण्यासाठी कामातुन दिलासा मिळणार आहे . विधेयकांमध्ये नेमके काय आहे ते पुढीलप्रमाणे पाहुयात .

या विधेकाचे मुख्य हेतु म्हणजे कार्यालयीन ( Office ) कामकाज संपल्याच्या नंतर अधिकारी / बॉसकडून कर्मचाऱ्यांना फोन व ई-मेल करुन त्रस्त करु नये . ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक ताण वाढते व त्यांना आपले वैयक्तिक आयुष्य जगता येत नाही .

यांमळे सदर विधेकानुसार कार्यालयीन कामकाजानंतर कामकाजापासुन डिस्कनेक्ट होण्याचा अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे . एक प्रकारे कार्यालयीन कामकाजानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी बॉस कडून कोणत्याही प्रकारचा ताण दिला जाणार नाही . हे विधेयक मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा हा एक प्रकारचा अधिकारी होणार आहे .

निवृत्तीसाठी  अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका तसेच महाराष्ट्र नागरी निवृत्तीवेतन नियम 1982 पुस्तिका.. फक्त 100/- रुपये मध्ये सदर पुस्तिका PDF स्वरुपात WhatsApp वर लगेच पाठवली जाईल . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

सदर विधेयक सरकारी तसेच खाजगी यंत्रणामध्ये काम कर्मचाऱ्यांनासाठी तयार करण्यात आलेला आहे . सदरचे विधेयक लोकसभेचे सदस्य श्रीम.सुप्रिया सुळे यांनी मागील शुक्रवारी लोकसभेत सदर खासगी विधेयक मांडले आहे .

या विधेयकाच्या मंजूरी नंतर नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे . व एक प्रकारचे कायदेशिर संरक्षण प्राप्त होणार आहे .

Leave a Comment