@marathiprasar पवार प्रतिनिधी [ Can the children of employees working in government/semi-government/corporations avail the benefit of reservation under non-creamy layer? ] : आपण जर सरकारी / निमसरकारी / महामंडळ मध्ये कार्यरत असाल तर आपल्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येतो का ? याबाबत शासन निर्णय नेमका काय आहे ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
अनुसुचित जाती / जमाती या प्रवर्गातील जातींना संविधानानुसार घटनात्मक आरक्षण दिले आहेत , तर इतर जातींना आरक्षण द्यायचे असल्यास , वैधानिक रित्या आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात आलेले आहेत . यांमध्ये प्रगत उत्पन्न गटात मोडत असल्यास अशांना आरक्षणाचा लाभ दिला जात नाही .
यासाठी सरकारकडून नॉन क्रिमिलेअर प्रमाणत्र दिले जाते . सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उत्पन्न मर्यादा नुसार त्यांच्या मुलांसाठी आरक्षणाचा लाभ घेवू शकता .
राज्य सरकारच्या दिनांक 04.01.2021 रेाजी संदर्भ नियामावली नुसार राज्य सरकारी / निमसरकारी सेवेत गट ब , क व ड श्रेणी मध्ये कार्यरत असून , त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 8,00,000/- रुपये पेक्षा असून असले तरीही ते स्वत : साठी व आपल्या पाल्यांसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा लाभ घेवू शकतील .
हे पण वाचा : डेटा एन्ट्री ऑपरेटर , लिपिक / क.सचिवालय सहाय्यक पदांच्या 3,131 जागेसाठी महाभरती !
त्याचबरोबर गट क व ड श्रेणीमध्ये पती – पत्नी दोघेही सेवेत असतील अशा प्रकरणी देखिल नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेवू शकतील . तसेच गट ब मध्ये सेवेत पती / पत्नीपैकी एकजन सेवेत असल्यास तरी देखिल नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेवू शकतील .
गट अ मध्ये कार्यरत अधिकारी / प्राध्यापक यांना नॉन क्रिमिलेअरचा लाभ दिला जात नाही .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !