@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Other deductions from regular salaries of employees (credit institution loan installments, subscriptions, etc.) canceled; decision by the Finance Department. ] : कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनातुन इतर प्रकारच्या कपाती रद्द करण्याचा निर्णय वित्त विभाग मार्फत घेण्यात आला आहे .
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन हे वित्त विभागाच्या निर्देशानुसार दिले जाते . सदर वेतनातुन कर्मचाऱ्यांने पतसंस्था मार्फत घेण्यात आलेल्या कर्जाचे हप्ते तसेच पतसंस्थांच्या कपाती केल्या जातात .
परंतु अशा प्रकारच्या कपातीला आता वित्त विभाग मार्फत रोख लावण्यात आलेली आहे . जिल्हा परिषद नाशिक येथील काही कर्मचारी संघटनांच्या अंतर्गत कलहामुळे सदर प्रकारच्या कपातीवर ग्रामसेवक संघटना मार्फत आक्षेप घेण्यात आलेला होता .
यामुळे वित्त विभागाकडून अशा प्रकारच्या कपात आता कर्मचाऱ्यांच्या थेट वेतनातुन न करता आता सदर पतसंस्थांच्या कपाती ह्या कर्मचाऱ्यांच्या बँकेतुन केली जाणार आहे .
कर्मचाऱ्यांचे सर्व वेतन हे प्रथमत : कर्मचाऱ्यांचे खात्यात जमा करण्यात येईल , त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या विविध पतसंस्था मधील कर्जाचे हप्ते तसेच पतसंस्थांच्या वर्गणी कपात केल्या जातील .
- ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !
- देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !
- दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !
- राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय रजेची वैशिष्ट्ये – अर्जित रजा ( नियम 50 ) ; जाणून घ्या सविस्तर !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर !