@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Heavy rain with thunder warning for these 12 districts of the state in the next 48 hours ] : राज्यात सध्या मान्सुनने आगमन केले असून , पुढील 48 तासांमध्ये 12 जिल्ह्यांना पावासाचा जोरदार मेघगर्जनासह इशारा देण्यात आला आहे .
सध्या राज्यात पावसाने जोरदान हजेरी लावली असून , राज्यात पाऊस भाग बदलुन पडत आहे . आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 12 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
राज्यात विदर्भ , मराठवाडा व मध्य महाराष्ट्र भागात तसेच गोव्यातील काही ठिकाणी मेघगर्जनासह वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा ; सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
48 तासाचा हवामान अंदाज : पुढील 48 तास म्हणजे आज व उद्या रोजी ( दिनांक 09 ते 10 जुन ) या कालावधीमध्ये राज्यातील कोल्हापुर , अहिल्यानगर , पुणे , सिंधुदुर्ग , रत्नागिरी , सांगली , सातारा , धाराशिव , लातूर , नांदेड , बीड , सोलापुर या 12 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
सदर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व तसेच ताशी 40 ते 50 कि.मी वेगाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . या 12 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .