ST प्रवासात पुरुषांना देखिल तिकिटामध्ये विशेष सुट ; परिवहन मंत्री सरनाईक यांची मोठी घोषणा !

Spread the love

@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Special exemption for men as well as women in ST travel; Transport Minister Saranaik’s big announcement. ] : राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे . तर आता नुकतेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणानुसार पुरुषांना देखिल विशेष सुट दिली जाणार आहे .

पुरुषांना मिळणार 15 टक्के सुट : राज्यातील पुरुषांना बस प्रवासात विशेष सुट दिली जाणार असल्याची घोषणा यशवंत नाट्य मंदीर येथे आयोजित करण्यात आलेल्या शुभारंभ व गौरव पुरस्कार कार्यक्रम दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे .

बस प्रवासामध्ये आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुरुषांना 15% आरक्षण दिले जाणार आहे . सदर आरक्षण हे कमी गर्दी असणाऱ्या हंगामामध्ये बस प्रवासाची संख्या वाढावी याकरीता सदर प्रवास सवलत देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे . सदर योजना ही माहे जुलै 2025 पासुन सुरुवात केली जाणार असून ई- शिवनेरी सारख्या आरामदायी बसमध्ये प्रवास करणाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे .

हे पण वाचा : ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 125 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

नेमकी योजना काय आहे ? : माहे जुलै ते सप्टेंबर व माहे जानेवारी ते मार्च  या कालावधीमध्ये बस मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी असते . या काळामध्ये प्रवासांची संख्या घटली तरी , बसला फेरीसाठी तेवढाचा खर्च येतो . यामुळे या काळात बस महामंडळच्या तोटा मध्ये घट करण्यासाठी सदर योजना फायदेशिर ठरणार आहे .

15 टक्के सवलत साठी या दोन अटी : पुरुषांना 15 टक्के सुट घेण्यासाठी वरी नमुद केलेल्या कमी गर्दीच्या  हंगामात प्रवास करावे लागणार आहे , तसेच तिकिटाचे आगाऊ बुकिंग करावे लागणार आहे .

Leave a Comment