@marathiprasar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Important / beneficial government decisions for Zilla Parishad employees GR issued on 27.05.2025 ] : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 27 मे 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार दि.01.01.2024 ते दि.31.12.2024 या वर्षात गट विमा योजना ( GIS ) योजना अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचे सदस्यत्व संपुष्टात आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे देय बचत निधी प्रदान करण्याचे तक्ते सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
वित्त विभागाच्या दि.31.01.2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सदर दि.01.01.2025 ते दि.31.12.2025 या कालावधीमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बचत निधीचे लाभाचे परिगणितीय तक्ते निर्गमित करण्यात आले आहेत , त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या परिगणितीय तक्ते सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत .
यानुसार दि.01.01.2025 ते दि.31.12.2025 या कालावधीमध्ये राजीनाम / सेवेत असताना मृत्यु पावले किंवा सेवानिवृत्त व इतर कारणांने ज्या कर्मचाऱ्यांचे सभासदत्व संपुष्टात येईल अशा कर्मचाऱ्यांना / त्यांच्या वारसांना सदर तक्यात नमुद बचत निधीची रक्कम देण्याची कार्यवाही संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
हे पण वाचा : शिक्षक , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती !
याशिवाय सदर बचत निधीवर दि.01.01.2025 पासुन दरसाल दरशेकडा 7.1 टक्के इतक्या दराने ( तिमाही चक्रवाढ ) दराने व्याज अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील बचत निधीचे सदस्य होण्याचा दिनांक , चालु वर्षातील महिना ( संपुष्टात येणारा ) याबाबत सविस्तर परिगणितीय तक्ते पुढीलप्रमाणे पाहु शकता .
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !