राज्यातील या जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद , राज्याचा तापमानाचा पारा चढला !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे . यामुळे काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहेत . राज्यात यंदाच्या वर्षी सर्वाधिक तापमानाची नोंद मराठवाड्यात झाली आहे . सध्या राज्याचा तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे .

मागील दोन दिवसाचे तापमानाचा विचार केला असता , मोलगाव मध्ये तापमान नोंद 42.6 अंश सेल्सिअर इतकी नोंद करण्यात आली . तर राज्यातील नाशिक , सातारा , अकोला , धुळे , पुणे , अहमदनगर , चंद्रपुर , वाशिम या जिल्ह्यांमध्ये तापमानाची नोंद 40 अंश सेल्सिअस अधिक नोंदविण्यात आलेली आहे . यामुळे राज्यात सध्या उष्णतेची मोठी लाट पसरलेली आहे .

राज्यात या जिल्ह्यात तापमानाची सर्वाधिक नोंद : राज्यांमध्ये मराठवाड्यातील लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामंध्यम स्थित औरद शहाजनी या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद 44 अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आलेली आहे . यामुळे लातुर जिल्ह्यात सध्या तापमान मोठ्या प्रमाणात उष्ण झाले आहेत .

सध्या राज्यात सर्वत्रच उष्णतेचे प्रमाण अधिक झाल्याने , उष्माघाताचे प्रमाणे अधिकच वाढले आहेत , यामुळे नागरिक थंड पेयाकडे अधिक आकर्षित होत आहेत . उष्णतेचे प्रमाण अधिक वाढले असल्याने , शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे . यामुळे जास्त पाणी प्यावे , तसेच आवश्यक असेल तर उन्हात बाहेर जावे , शेतामधील कामे दिवसा / सायंकाळच्या वेळी करावेत .

सध्या राज्याचे तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे , यामुळे गर्मीचे प्रमाण अधिक वाढले आहेत . गर्मीचे प्रमाण वाढत असल्याने , राज्यात अवकाळी पावसाचे प्रमाण अधिकच वाढले आहेत . तर विदर्भ / मराठवाडा भागांमध्ये मागील आठवड्यांमध्ये गारपीटासह मोठा अवकाळी पाऊस पडला आहे .

Leave a Comment