शेतकऱ्यांना पोकरा या योजना अंतर्गत गांडूळ खत / सेंद्रिय निविष्ठा तसेच नाडेप उत्पादन युनिट अनुदान , जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने , राज्य शासनांकडून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे . यांमध्ये शेतातील कचरा , शेण , वनस्पतीजन्य पदार्थ यांच्या पासून गांडूळ खत बनविण्यास अनुदान प्राप्त करुन दिले जाते .

या गांडूळ खतांमध्ये विविध अन्नद्रव्ये तसेच संजीवके ,शेतीकरीता उपयुक्त जीवाणूची निमिर्ती होते , यामुळे या खतांपासून पीकांची मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होते . याकरीता राज्य शासनांकडून शेतकऱ्यांना सदर पोकरा योजना अंतर्गत गांडूळ खत / सेंद्रिय निविष्ठा / नाडेप उत्पादन युनिट करीता अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते . ही योजना राबविण्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे शेतकऱ्यांना शेती पिकाची उत्पान क्षमता वाढीकरीता मदत करणे होय .

या योजनांच्या माध्यमातुन गांडूळ खत युनिट लाभाकरीता आवश्यक पात्रता : सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्याकरीता अर्जदार शेतकऱ्याकडे 2 ते 5 हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक असेल , यांमध्ये प्रथम अल्प / अत्यल्प भूधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल .

नाडेप कंपोस्ट उत्पादन यूनिट करीता आवश्यक पात्रता : सदर नाडेप कंपोस्ट उत्पादन यूनिट करीता ग्राम कृषी संजीवनी समितीने ज्या शेतकऱ्यांना मान्यता मिळाली आहे अशा शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल , तसेच गांडूळ खत उभारल्याच्या नंतर लाभार्थ्याकडे निदान 2 पशुधन ( गायी / म्हशी ) उपलब्ध असणे आवयक असणार आहेत .  

किती मिळणार अनुदान :  गांडूळ खत उत्पादन युनिट / नाडेप कंपोस्ट युनिट करीता 10,000/-  (अक्षरी – दहा हजार रुपये ) , तर सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट करीता 6,000/- रुपये (अक्षरी  – सहा हजार रुपये ) अनुदान दिले जाते .

सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता आवश्यक कागदपत्रे : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता लाभार्थ्यास शेतीचा सातबारा , 8 अ उतारा , जातीचा दाखला इ. कागदपत्रे आवश्यक असतील .

असा करावा लागेल आवेदन : जर या योजना अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर https://dbt.mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकता ..

Leave a Comment