@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 08 important cabinet decisions were taken in the state cabinet meeting held on 22 April 2025.] : दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 08 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय घेण्यात आले आहेत . सदर मंत्रीमंडळ निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक : क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक त्यांच्या जन्मगावी नायगाव ता.खंडाळा जि.सातारा या ठिकाणी बांधण्यास व त्याच ठिकाणी महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यास 142 कोटी 60 लाख रुपये तर महिला प्रशिक्षण केंद्र करीता 67,17,000/- रुपये इतका तरतुद करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
02.गोसीखुर्द या प्रकल्प करीता निधीची तरतुद : भंडारा जिल्हा मधील गोसीखुर्द या राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामाकरीता 25,972 कोटी 69 लाख रुपये इतका निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
कामगार कायद्यामध्ये सुधारणा : केंद्रीय कामगार संहिताच्या अनुषंगाने महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यात आले आहेत . यानुसार राज्याच्या कामगार विभाग मार्फत वेतन संहिता 2025 व औद्योगिक संबंध संहिता नियम 2025 तयार केले आहे . सदर सुधारित नियमांचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरी साठी पाठविण्यात आला आहे .
विधी अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ : विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत कार्यरत असणारे कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून , आता सदर अधिकाऱ्यांना एकुण 45,000/- रुपये मानधन व दुरध्वनी व प्रवास खर्चापोटी 5,000/- असे एकुण 50,000/- रुपये दरमहा मानधन अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
अतिरिक्त व जलदगती न्यायालयांना मुदवाढ : राज्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात 16 अतिरिक्त न्यायालये तर 23 जलदगती न्यायालये आहेत , सदर न्यायालयांना पुढील 2 वर्षांच्या मुदतीकरीता मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
मत्स्यव्यवसाय : मत्सव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यास , तसेच मच्छिमार , मत्स्य संवर्धकांना वीज , पाणी तसेच इतर सुविधा तसेच विविध सवलतींचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
प्रकल्पग्रस्तांसाठी घराची निमिर्ती : मुंबइ्र पायाभुत सुविधा प्रकल्प अंतर्गत प्रकल्पग्रस्तांच्या घरांची निर्मिती करीता वितरण करण्यात आलेल्या धोरणांमध्ये सुधारणा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
चाकण – शिक्रापुर चार पदरी रस्ता : तळेगाव ते चाकण या एकुण 53 कि.मी करीता चार पदरी रस्ता करण्यास 4,206 कोटी 88 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !