@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State government’s instructions to immediately pay pension dues and other financial dues of retired officers/employees. ] : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अंतर्गत निवृत्त होणारे अधिकारी / कर्मचाऱ्यांना पेन्शन तसेच इतर आर्थिक लाभ हे तातडीने वितरीत करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री श्रीम.साकोरे – बोर्डीकर यांनी दिलेले आहेत .
निर्मल भवन या ठिकाणी सदर विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते . यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी तसेच जीवन प्राधिकरणाचे व वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते .
या बैठकीमध्ये मा.राज्यमंत्री श्री.साकोरे बोर्डीकर यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करुन त्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढत , सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकार सकारात्मक असल्याचे सांगत , वेतन आयोगाच्या अंमलबजावणी संदर्भातील समस्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहेत .
त्याचबरोबर वय वर्षे 80 व 90 वर्षे पेक्षा अधिक असणारे निवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना देय असणारी रक्कम देणे आवश्यक असून सदर बाबींवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची आश्वासन श्रीम.साकोरे -बोर्डीकर यांनी दिले आहेत .
या बैठकीमुळे सदर विभागातील निवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न लवकरच सोडविले जाणार आहेत .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !