लोकसभा निवडणुक 2024 साठी वंचित बहुजन आघाडची पहिली व दुसरी यादीतील 19 उमेदवारांची यादी पाहा सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : लोकसभा निवडणुका 2024 साठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडर यांनी कोणत्या इतर पक्षासोबत युती न करता ऐकटेच लढण्याचा निर्णय घेतले . आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दोन यादी जाहीर करण्यात आलेल्या असून , लवकरच तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे .

वंचित बहुजन आघाडी पक्षाने उमेदवारी जाहीर करताना , जातीचा विचार न करता इतर पक्षातील उमेदवारांना देखिल यांमध्ये संधी देण्यात आली आहे . मात्र पहिल्या यादीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सहकार्यांना प्रथम संधी दिली आहे .पहिली व दुसरी यादीमध्ये उमेदवारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पहिली यादी मधील वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार :

  • राजेश बेले – चंद्रपुर
  • प्रकाश आंबेडकर – अकोला
  • वसंतराव मगर – बुलडाणा
  • प्राजक्ता पिल्लेवान – अमरावती
  • प्रा.राजेंद्र साळूंके – वर्धा
  • खेमसिंग पवार – यवतमाळ – वाशिम
  • सांगली मतदारसंघ  – येथे श्री.प्रकाश शेंडगे यांच्या OBC बहुजन पार्टीला पाठींबा देण्यात आलेला आहे .
  • नागपूर मतदारसंघ – येथे काँग्रेस उमेदवार असणारे विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे .

वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या यादीमध्ये इतर जातीतील उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आलेली आहे , दुसरी यादीमध्ये एकुण 11 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

मतदारसंघउमेदवाराचे नावजात / धर्म
लातुरनरिसिंहराव उदगीरकरमातंग
हिंगोलीडॉ.बीडी चव्हाणबंजारा
सातारामारुती धोंडीराम जानकरधनगर
माढारमेश नागनाथ बारसकरमाळी
सोलापुरराहूल काशिनाथ गायकवाडबौद्ध
धुळेअब्दुर रहमानमुस्लीम
मुंबई उत्तर मध्यअबु हसन खानमुस्लीम
रत्नागिरी – सिंधुदुर्गकाका जोशीकुणबी
जालनाप्रभाकर देवमन बकलेधनगर
रावेरसंजय पंडीत ब्राम्हणेबौद्ध
हातकलंगणेदादासाहेब दादागौडा चौगौडा पाटीलजैन

Leave a Comment