@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular regarding declaring difficult areas for intra-district transfers ] : सन 2025 च्या जिल्हा अंतर्गत बदली करीता अवघड क्षेत्र घोषित करणेबाबत ग्रामविकास विभागांकडून दिनांक 05 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आले आहेत कि , दिनांक 18 जुन 2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्रातील शाळांची यादी दर 03 वर्षांनी मार्च महिन्यात पुनर्विलोकन करुन सुधारित करण्याची तरतुद आहे .
यापुर्वीची अवघड क्षेत्राची यादी सन 2022 मध्ये सुधारित करण्यात आली असल्यामुळे सन 2025 च्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेकरीता सद्य : स्थितीत सन 2025 स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे .
त्यानुसार सन 2025 स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी 15 मार्चनंतर घोषित करण्याबाबत , सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदांना कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच सदर कालावधीत अवघड क्षेत्राची सुधारित यादी घोषित न केल्यास , सन 2022 ची अवघड क्षेत्राची यादी ग्राह्य धरण्यात येईल .
तथापि या बाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यास , त्याची जबाबदारी ही संबंधित जिल्हा परिषदेची राहील असे नमुद करण्यात आले आहेत .तसेच अवघड क्षेत्राची यादी ही सुधारित करताना संवादछायेचा प्रदेश हा केवळ महाप्रबंधक , बीएसएनएल यांच्या अहवालानुसार ग्राह्य न धरता अशा ठिकाणी अन्य कंपन्यांचे नेटवर्क उपलब्ध आहे का हे देखिल तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच सन 2025 स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी दिनांक 15 मार्चपर्यंत घोषित झाल्यानंतर याबाबतची माहिती ही ऑनलाईन पोर्टलवर भरण्याकरीता 08 दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !