@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Increased HRA for state employees in addition to the salary for the month of February ] : राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ता माहे फेब्रुवारी पेड इन मार्च महिन्यांच्या वेतन देयकासोबत , थकबाकीस अदा करण्यात येणार आहेत , तशी शालार्थ प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे .
शालार्थ प्रणालीमध्ये डी.ए चे दर 53 टक्के टाकल्यानंतर ऑटो सुविधानुसार घरभाडे भत्ताचे दर हे वाढले जात आहेत . वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सदर वाढ करण्यात येत आहेत . कारण डी.ए मध्ये 50 टक्के पेक्षा अधिक वाढ झाल्यानंतर सदर घरभाडे भत्ता मधील वाढ नियोजित होती .
जुलै पासुन थकबाकी मिळणार : माहे जुलै 2024 पासुन राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकीसह , घरभाडे भत्ता थकबाकी देखिल मिळणार आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या एकुण वेतनांमध्ये मोठी वाढ होत आहे .
सुधारित घरभाडे भत्ताचे दर : वास्तव्याच्या ठिकाणानुसार यापुर्वी 9 टक्के , 18 टक्के व 27 टक्के घरभाडे भत्ता दर होते , आता सुधारित दरानुसार वास्तव्याच्या ठिकाणानुसार 10 टक्के , 20 टक्के व 30 टक्के असे सुधारित घरभाडे भत्ता मिळणार आहेत .
यामुळे आता माहे फेब्रुवारी पेड इन मार्च 2025 वेतन देयकासोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता सह डी.ए फरक व वाढीव घरभाडे भत्ता सह घरभाडे भत्ता थकबाकी अदा करण्यात येणार आहे .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !
- गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !
- राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
