@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update on 53 percent DA hike for state employees from July 2024 ] : राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांना माहे जुलै 2024 पासुन 3 टक्के डी.ए वाढ अद्याप प्रलंबित आहे . यामागचे नेमके कारण काय आहे व निधीची कमतरता कशामुळे होत आहे . या संदर्भातील सविस्तर महत्वपुर्ण अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
3 टक्के डी.ए वाढ : राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक 01.07.2024 पासुन केंद्र सरकारच्या धर्तीवर 53 टक्के दराने महागाई भत्ता वाढ नियोजित आहे . परंतु सदर निर्णय अद्याप पर्यंत प्रलंबित असल्याने कर्मचारी / पेन्शन धारकांमध्ये मोठी नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे .
निधी अभाव : राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीणी योजनांमुळे सरकारी गंगाजळीत पैसा उरत नसल्याने , राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीसाठी निधी अभावी निर्णय अद्याप प्रलंबित आहे .
08 महिन्याचा डी.ए प्रलंबित : लाडकी बहीण योजनांमुळे निधी अभावी राज्य शासकीय / निमशासकीय व इतर पात्र असणारे कर्मचारी तसेच पेन्शन धारकांचा माहे जुलै 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत ( एकुण 08 महिने ) महागाई भत्ता प्रलंबित आहे .
राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या : सातवा वेतन आयोगातील दिनांक 01.07.2024 पासुन महागाई भत्ता व नियोजित घरभाडे भत्ता पनर्रचना करण्यात यावी . तसेच वेतनत्रुटी निवारण समितीचा अहवालास तात्काळ मंजुरी देण्यात यावा . तसेच सुधारित NPS पेन्शन प्रणालीचे दि.01.03.2024 पासुन अंमलबजावणी संदर्भातील शासन आदेश तात्काळ जारी करण्यात यावेत .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !