@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding changes in school timings on Saturdays ] : शनिवार सकाळ सत्रातील शाळेच्या वेळेतील बदल करणेबाबत , शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद बुलडाणा कार्यालयामार्फत दिनांक 21.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , सकाळी 9 पुर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पुर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे सर्व वर्ग सकाळी 9.00 अथवा 9.00 नंतर भरविण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत .
तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या शनिवारच्या दिवशी सकाळी 9.00 ते 1.00 या वेळेत भरविणे विद्यार्थी व पालकांसाठी गैरसोयीचे असल्याने , सदरची वेळ ही पुर्वीप्रमाणेच ठेवण्यात यावी अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून करण्यात आलेली आहे .
त्यानुसार जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक शाळांची शनिवार रोजीची वेळ ही पुर्वीप्रमाणे सकाळी 7.30 ते 11.00 या वेळेत घेणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत . तरी सदर परिपत्रकानुसार सूचित करण्यात आलेले आहेत कि , सर्व प्राथमिक प्राथमिक शाळांची शनिवारच्या शाळेची वेळी ही सकळाी 7.30 ते 11.00 अशी करण्यात येत आहे .
याबाबत शालेय वेळेच्या तरतुदीचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता घेणेबाबत सर्व संबंधितांना सुचित करण्यात येत आहेत .

- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !
- दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ ; मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांस यश !
- ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !
- देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !