@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 major important decisions were taken in the cabinet decision on 11.02.2025 ] : दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य शासनांच्या मंत्रीमंडळ बैठकीत 03 मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत . सविस्तर निर्णय ( Cabinet Nirnay ) पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
01.पालघर येथील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प सुधारणा : जिल्हा पालघर येथील सुकसाळे ता.विक्रमगड येथील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारणा खर्चास सदर मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे . एकुण 2 हजार 599 कोटी 15 लाख रुपये इतकी रक्कम खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
02.जनाई शिरसाई उपसा सिंचना योजना : पुणे जिल्हा मधील पुरंदर , दौंड व बारामती तालुक्यातील सिंचन करीता जनाई , शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका द्वारे रुपांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली असून , याकरीता येणारा एकुण खर्च 438 कोटी 47 लाख 483/- रुपये इतकी रक्कम खर्च करण्यास सदर बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे .
03.म.आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियम 2019 मध्ये सुधारणा : महाराष्ट राज्य आपत्ती व्यवस्थापन नियम 2019 मध्ये दुरुस्ती करण्यास राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मान्यता दिली असून , नियम 3 मध्ये राज्य व्यवस्थापन प्राधिकरणाची रचना निश्चित करण्यात आलेली आहे .
सदरची रचना सुधारित करुन प्राधिकरणांध्ये अध्यक्ष व 09 सदस्य असणार आहेत . राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री हे पदसिद्ध सदस्य तर अन्य पदसिद्ध सदस्य पदाकरीता मुख्यमंत्री प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून इतर मंत्र्यांना नामनिर्देशित करतील अशी मंजूरी देण्यात आलेली आहे .
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !