@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Approval to create farmer apps and interface portals that are useful and comprehensive for farmers ] : शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे सिंगल विंडोज इंटरफेस असणारे फार्मर ॲप व इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत , राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दि.31.01.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कृषी व तद्नुषंगिक कामे करीत असताना विविध प्रश्न समस्यांचा सामना करावा लागतो , शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण एकाच ठिकाणी करण्यासाठी त्यांना कृषी विषयक योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देणे ..
योजनांचा लाभ तत्परतेने उपलब्ध करुन देणे , कृषी विषयक योजनांचा लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी अर्ज करणे इ. सर्व बाबींकरीता एकाच ठिकाणी सुविधा मिळणे आवश्यक आहे .त्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित Singal Window Interface असलेले Farmer App व Interface पोर्टल तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्याचे विचाराधीन होते .
तर सदर शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित Singal Window Interface असलेले Farmer App व Interface पोर्टल तयार करण्यासाठी समितीची स्थापना येत आहे .
सदर समितीच प्रमुख कार्य कृषी विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहीती विशद करणे , तसेच विविध घटकांची अथवा बाबींची / लाभांची माहिती प्राप्त करुन घेणे होय .
- शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे फार्मर ॲप्स व इंटरफेस पोर्टल तयार करण्यास मंजूरी ; GR दि.31.01.2025
- राज्य वेतन सुधारणा समिती खंड – 2 मधील सुधारित वेतनश्रेणी या पदांस लागु ; शासन निर्णय निर्गमित दि.03.02.2025
- आता राज्यात सरकारी / निमसरकारी कार्यालयात मराठी भाषाचा वापर अनिवार्य ; अन्यथा होणार कारवाई , GR निर्गमित दि.03.02.2025
- काही महत्वपुर्ण चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- NPS धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय ; पाहा सविस्तर !