@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee leave new adhisuchana ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सुधारित शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे .
सदर शासन अधिसूचनेनुसार नमूद करण्यात आलेली आहे की , नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे आलेल्या कोणत्याही संख्येतील शनिवार , रविवार आणि / किंवा सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्याची तसेच नैमित्तिक रजेमध्ये आलेली सुट्टी किंवा सुट्ट्यांची मालिका नैमितिक रजेस जोडून घेण्याची परवानगी देता येईल .
याशिवाय एका वेळेस सलगपणे घेतलेल्या नैमैत्रिक रजा व सुट्ट्या यांचा एकूण कालावधी 07 दिवसांपेक्षा अधिक असणार नाही , असे स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे . तर अपवादात्मक परिस्थितीत 10 दिवसापर्यंत वाढवता येईल , असे नमूद करण्यात आलेली आहेत . त्याचबरोबर एका कॅलेंडर वर्षामध्ये केवळ 08 दिवस नैमित्तिक रजा घेता येतील , असे स्पष्ट करण्यात आले आहेत .
अखंडित रजेची कमाल मर्यादा : कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यास सलगपणे 05 वर्षापेक्षा अधिक कालावधी करिता कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून , जो शासकीय कर्मचारी स्वीयेत्तर सेवेव्यतिरिक्त किंवा रजेशिवाय सलग 05 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अनुपस्थित राहील , त्या शासकीय कर्मचाऱ्यांनी शासन सेवेचा राजीनामा दिला आहे , असे ग्राह्य धरण्यात येतील , असे स्पष्ट करण्यात आले आहेत .
तर शासकीय कर्मचाऱ्याला अशा अनुपस्थितीची कारणे स्पष्ट करण्याची वाजवी संधी सदर शासन अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे , या संदर्भातील सविस्तर शासन अधिसूचना डाऊनलोड करण्याकरिता Click Here
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !