सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर ; नविन वेतन आयोग लागु करण्यास केंद्र सरकारची मंजूरी !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Central Government approves implementation of New Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत अखेर केंद्र सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2026 पासुन सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे .

प्राप्त माहितीनुसार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे . या निर्णयामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दि.01.01.2026 पासुन नविन वेतन आयोगाचा ( New pay Commission ) लाभ मिळणार आहे .

केंद्रीय कामगार युनियची बऱ्याच दिवसांपासुन आठवा वेतन आयोग लागु करण्याची मागणी होत होती , सदर मागणीस अखेर आज रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे . नविन वेतन आयोग समितीची स्थापना करण्यास सदर निर्णयानुसार मंजूरी देण्यात आलेली आहे .

सातवा वेतन आयोगाचा कार्यकाल हा दि.31.12.2025 अखेर पर्यंत असल्याने , दिनांक 01.01.2026 पासुन नविन वेतन आयोगानुसार वेतन लागु करणेबाबत आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .

किमान मुळ वेतनात वाढ : आठवा वेतन आयोगानुसार किमान मुळ वेतन हे 25740/- रुपये पर्यंत वाढू शकते , याशिवाय पेन्शन मध्ये देखिल वृद्धी होणार आहे .

Leave a Comment