@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR regarding the implementation of benefits to all other eligible employees of semi-government offices, district councils, government corporations, like state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे राज्यातील निमशासकीय कार्यालये , जिल्हा परिषदा तसेच सर्व शासकीय महामंडळे व इतर पात्र कर्मचाऱ्यांना समुह वैयक्तिक अपघात विमा योजना लागु करणे बाबतचा वित्त विभाग मार्फत 11.08.2017 रोजी GR निर्गमित करण्यात आला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे , राज्यातील निमशासकीय कार्यालये , स्थानिक स्वराज्य संस्था ( शहरी / नागरी ) तसेच शासकीय महामंडळे , मान्यता प्राप्त / अनुदान प्राप्त संस्था मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांना समुह वैयक्तिक अपघात विमा योजना लागु करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे .
सदरची योजना ही एैच्छिक स्वरुपाची असल्याने , यांमध्ये सहभागाकरीता अधिकारी / कर्मचारी यांची अनूमतीपत्र तसेच नामनिर्देशन पत्र संबंधित विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्या सादर करणे आवश्यक असेल . यांमध्ये गट अ ते ड संगर्वातील कर्मचांना 10 लाख रुपये विमा रक्कम करीता वार्षिक 300/- रुपये वर्गणी भरावी लागेल , यांमध्ये वस्तु व सेवा कर म्हणून 45/- रुपये असे एकुण 354/- रुपयांचा वार्षिक हप्ता भरावा लागेल .
सदर हप्ता रक्कम ही दरवर्षी माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतन देयकातुन कपात करण्याचे निर्देश आहेत . सदर विमा रक्कम वसुल करण्याची जबाबदारी ही संबंधित कार्यालय प्रमुखांची असणार आहे .
यांमध्ये अपघातामध्ये मृत्यु / कायमचे अपंगत्व / विकलांगता / दोन्ही ( डोळे / पाय / हात / पाय ) गमावल्यास 100 टक्के विमा रक्कम प्राप्त होते . अन्यथा अपघाताच्या स्वरुपानुसार , विमा टक्केवारी प्राप्त होते .
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !