@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ As many as 30,000 contractual employees have been included in the state government service ] : राज्यातील तब्बल 30,000 कंत्राटी कर्मचारी राज्य शासन सेवेत समावेशन करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला असल्याने ,सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त होणार आहे .
राज्य शासनांच्या आरोग्य विभाग अंतर्गत सर्वाधिक कंत्राटी कर्मचारी सेवेत आहेत , बरेच कंत्राटी कर्मचारी 15 वर्षापेक्षा अधिक सेवा पुर्ण केल्या आहेत . सदर कर्मचाऱ्यांच्या सेवेचा विचार करता , त्यांना राज्य शासन सेवेत नियमित पदावर घेण्याचा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे .
यांमध्ये स्टाफ नर्स , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , औषध निर्माण अधिकारी , लेखा अधिकारी , बहुउद्देशिय कर्मचारी , कार्यक्रम अधिकारी इ. पदांचा समावेश आहे . याबाबत दिनांक 13 मार्च 2024 रोजी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीमंडळामध्ये झालेल्या निर्णयानुसार , सदर आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत नियमित करण्यात येणार आहेत .
हे पण वाचा : मंत्र्यांचे खातेवाटप यादी..
याकरीता राज्य शासनांकडून संबंधित कार्यालयांकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांची विहित नमुन्यात माहिती मागविण्याचे काम सुरु आहेत . सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून , ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा 15 वर्षापेक्षा अधिक झाल्या आहेत , अशा कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याची मागणी करण्यात आली आहे .
या संदर्भात राज्य शासनांकडून निकष जाहीर केले नाहीत , परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेचा तपशिलवार माहिती मागविण्यात आलेली आहे .
- शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे फार्मर ॲप्स व इंटरफेस पोर्टल तयार करण्यास मंजूरी ; GR दि.31.01.2025
- राज्य वेतन सुधारणा समिती खंड – 2 मधील सुधारित वेतनश्रेणी या पदांस लागु ; शासन निर्णय निर्गमित दि.03.02.2025
- आता राज्यात सरकारी / निमसरकारी कार्यालयात मराठी भाषाचा वापर अनिवार्य ; अन्यथा होणार कारवाई , GR निर्गमित दि.03.02.2025
- काही महत्वपुर्ण चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- NPS धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय ; पाहा सविस्तर !