@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ New initiative of the state government for higher education students from January 1 to 15 ] : उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी राज्य सरकारने दिनांक 01 ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये नवा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे , या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक फायदे होणार आहेत .
वाचन संकल्प महाराष्ट्राचा : या उपक्रमाचे नाव हे वाचन संकल्प महाराष्ट्राचा असा आहे , या उपक्रमांच्या माध्यमातुन , विद्यार्थ्यांना वाचनांकडे आकर्षिक करण्याकरीता दिनांक 01 ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये वाचन ,संवाद , सामूहिन वाचन तसेच पुस्तक परीक्षण , वाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहेत .
या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , सदर उपक्रमांच्या कार्यपद्धती तसेच मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या आहेत . परंतु सदर उपक्रम अंतर्गत नियमित अभ्यासक्रम व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचे पुस्तकाचे वाचन करायचे आहेत .
तर वाचन झाल्याच्या नंतर सदर वाचन केलेल्या पाठावर 500 शब्दांमध्ये सादरीकरण करायचे आहेत . याकरीता उच्च तंत्र शिक्षण विभाग मार्फत पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत .
हे सादरीकरण एक प्रकारचे स्पर्धेच्या स्वरुपात ठेवून दिनांक 26 जानेवारी रोजी पारितोषिकांचे प्रदान करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत . याकरीता राज्य , विभाग , जिल्हा व महाविद्यालयीन स्तरावर समितीचे गठण करण्यात आले आहेत .
या उपक्रम अंतर्गत राज्यातील 83 विद्यापीठे , सुमोर 12500 ग्रंथालयांचा समावेश असणार आहे . तर ग्रामीण / शहरी भागातील विद्यार्थी या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत .
- शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे फार्मर ॲप्स व इंटरफेस पोर्टल तयार करण्यास मंजूरी ; GR दि.31.01.2025
- राज्य वेतन सुधारणा समिती खंड – 2 मधील सुधारित वेतनश्रेणी या पदांस लागु ; शासन निर्णय निर्गमित दि.03.02.2025
- आता राज्यात सरकारी / निमसरकारी कार्यालयात मराठी भाषाचा वापर अनिवार्य ; अन्यथा होणार कारवाई , GR निर्गमित दि.03.02.2025
- काही महत्वपुर्ण चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- NPS धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय ; पाहा सविस्तर !