राज्यातील शाळांना अनुदान मंजूर करणेबाबत , महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.04.12.2024

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ School Grant anudan paripatrak ] : राज्यातील शाळांना अनुदान मंजूर करणेबाबत , शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 04 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या अंमलबजावणीबाबत , कायम विना अनुदान तत्वावर मान्यता देण्यात आलेल्या व कायम शब्द वगळलेल्या ( इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त ) , राज्यांमधील अनुदान पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असणाऱ्या प्राथमिक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर करणे बाबत , राज्याच्या उपसंचालक तसेच सर्व शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांच्या प्रति हे परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यातील अनुदानाकरीता पात्र ठरणाऱ्या व वेतन अनुदानाचे टप्पा घेत असणाऱ्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे , तसेच त्रुटीत असणाऱ्या विहीत कालावधीत त्रुटी – पुर्तता करण्यात आलेल्या शाळांना वैकल्पिक अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे , अघोषित शाळा / तुकड्यांना अनुदानासाठी पात्र करणे तसेच डोंगराळ व दुर्गम भागामधील पटसंख्या निकषात सुधारणा करणे व अनुदानास पात्र करणे व सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणेबाबत , निर्णय घेण्यात आला आहे .

त्याचबरोबर शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार ,तरतुद करण्यात आलेली आहे . तसेच यापुर्वी अनुदान घेत असणाऱ्या सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्या यांना दिनांक 01.06.2024 पासुन अनुदान मंजूर करण्यात आलेले आहेत , तसेच अनुदान पात्र ठरत असणाऱ्या माध्यमिक शाळांच्या अतिरिक्त तुकड्या यांना दिनांक 01.06.2024 पासुन अनुदान मंजूर करण्यात आले आहेत .

यानुसार माहे नोव्हेंबर 2024 अखेर प्रत्यक्षात अनुदान घेत असणाऱ्या 20 टक्के , 40 टक्के , 60 टक्के माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची व त्यावरील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची यादी सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .

शाळांना अनुदान मंजूर करणेबाबतचा परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment