@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ New pay Scale commity new shasan nirnay ] : वेतनत्रुटी निवारण समिती बाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दि.03.12.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन आदेशानुसा नमुद करण्यात आलेले आहेत कि , 7 व्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत विविध न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या , रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करुन त्याबाबत शिफारशी करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे .
सदर समितीच्या कामकाजाकरीता , मंत्रालयीन संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा सहा महिने अथवा समिती आपला अहवाल सरकारला सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या ता तारखेपर्यंत , तात्पुरत्या स्वरुपामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे .
तर दि.22 ऑक्टोंबर 2024 च्या शासन आदेशानुसार मंत्रालयीन संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा कालावधीकरीता दिनांक 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती , सदर मुदतवाढ दि.31 ऑक्टोंबर 2024 रोजी संपुष्टात आलेली आहे .
तर सदरच्या आदेशानुसार वेतनत्रुटी निवारण समिती 2024 च्या कामकाजाकरीता अधिग्रहीत करण्यात आलेल्या मंत्रालयीन संवर्गामधील 04 अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीस प्रशासकीय कारणास्तवर दि.30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहेत .

- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !