@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ NCP Sharad Pawar group 3ed List publish ] : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे . विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गटाने तगडा उमेदवार दिला आहे . यामुळे यंदा धनंजय मुंडे यांच्या विरोधात अटीतटीचा सामना पाहिला मिळणार आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विधानसभा निवडणुका 2024 साठी आतापर्यंत दोनदा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे . तिसऱ्यांदा नऊ उमेदवारांना तिकीट जाहीर केले आहे . सदर यादी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे .
यामध्ये परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाने तगडा उमेदवार विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात दिल्याने , धनंजय मुंडे यांना सदरची निवडणूक अधिकच जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे . कारण यांच्या विरोधात तिला उमेदवार यांची देखील लोकप्रियता परळी वैजनाथ मध्ये अधिक असल्याचे बोलले जात आहे .
तिसरी यादीमध्ये शरद पवार गटाकडून नव उमेदवारांना संधी दिली आहे . सदर उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे आहे …
- ज्ञायक पाटणी – कारंजा
- अतुल वांदिले – हिंगणघाट
- रमेश बंग – हिंगणा
- फयद अहमद – अनुशक्ती नगर
- राहुल कलाटे – चिंचवड
- अजित गव्हाणे – भोसरी
- मोहन जगताप – माजलगाव
- राजेसाहेब देशमुख – परळी
- सिद्धी रमेश कदम – मोहोळ
आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी मध्ये 11 महिला उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला आहे
- ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !
- देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !
- दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !
- राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय रजेची वैशिष्ट्ये – अर्जित रजा ( नियम 50 ) ; जाणून घ्या सविस्तर !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर !