आचारसंहिता नियमावली : राज्यात आज दि.15 ऑक्टोबर पासून , आचारसंहिता लागू ; जाणून घ्या आचारसंहिताचे सविस्तर नियम !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ aachaar sanhita rules ] महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका 2024 चे वेळापत्रक आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले असून , आजपासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे . आचारसंहिता काळामध्ये नेमक्या कोणत्या बाबीवर बंदी असते , याबाबतची  आचारसंहिता नियमावली पुढील प्रमाणे पाहूयात ..

या बाबीवर बंदी : आचारसंहिता काळामध्ये सरकारच्या धोरणात्मक निर्णय घेण्यास बंदी असते , म्हणजेच मतदारांना प्रोत्साहित करणे बाबतचे सरकार निर्णय घेऊ शकत नाही . त्याचबरोबर या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या सरकारी योजनाचे उद्घाटन त्याचबरोबर अमलबजावणी सदर आचारसंहिता कालावधीमध्ये करता येत नाही .

त्याचबरोबर सदर कालावधीमध्ये धार्मिक स्थळांचा प्रचार करिता वापर करण्यास , सक्त मनाई असते . तसेच राजकारण्यांना निवडणुकीच्या प्रचाराकरिता तसेच सभा रॅली याकरिता पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी असणे आवश्यक असते . त्याचबरोबर बॅनर , पोस्टर परवानगी शिवाय कोणत्याही ठिकाणी लावता येत नाही .

प्रचारामध्ये बालकांचा वापर करण्यास मनाई : निवडणुकीच्या प्रचाराकरिता अल्पवयीन मुलांचा वापर करण्यास , सक्त मनाई असते . यामध्ये रॅली /  मोर्चे यामध्ये मुलांचा सहभाग करून घेऊ शकत नाहीत  , अन्यथा कायदेशीर कारवाई होते .

सार्वजनिक ठिकाणचे पोस्टर / होल्डिंग काढले जाते : आचारसंहिता कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणचे राजकीय पक्ष तसेच राजकीय क्षेत्राशी निगडित असणारे होल्डिंग / फोटोज / पोस्टर्स काढले जाते किंवा झाकले जाते .

त्याचबरोबर रात्री 10:00 वाजेच्या नंतर तर सकाळी सहा वाजेच्या अगोदर सार्वजनिक सभा घेता येत नाही ..

Leave a Comment