गाईंच्या पालन पोषण करिता प्रतिदिन , प्रति पशु 50/- रुपये अनुदान देणेबाबत , GR निर्गमित ! दि.08.10.2024

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ deshi cow anudan Shasan Nirnay] : देशी गाईंच्या पालन पोषण करिता प्रतिदिन प्रति पशु 50/- रुपये अनुदान योजना राबवण्यास राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभाग मार्फत दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार आजमितीस देशी गाईंची उत्पादन क्षमता कमी असल्या कारणाने त्यांचे संगोपन करणे व्यावसायिक दृष्ट्या परवडत नसल्याने ,  त्याचबरोबर भाकड / अनुत्पादक गाईंचे संगोपन करणे पशुपालकांना फायदेशीर नसल्याने अशा प्रकारची जनावरे गोशाळेत ठेवली जातात . त्यामुळे गो-शाळांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्या करिता सन 2024-25 पासून महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असणाऱ्या गोशाळेला प्रतिदिन प्रति पशु 50/-  रुपये अनुदान देण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .

सदर योजनेचे स्वरूप : सदर योजनेच्या माध्यमातून पशुधन प्रणालीवर नोंदणी असलेल्या देशी गाईंच्या परिपोषणाकरिता प्रतिदिन अनुदान अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामध्ये प्रतिदिन प्रति देशी गायी करिता पन्नास रुपयाची अनुदान रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे.

त्याचबरोबर यामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून नोंदणीकृत असणाऱ्या गोशाळा, गोसदन , पांजरपोळ त्याचबरोबर गोरक्षण संस्था अनुदानाकरिता पात्र असणार आहेत . सदर संस्थेस गो – संगोपनाचा किमान तीन वर्षाचा अनुभव तसेच सदर गोशाळेत किमान दहा गोवंश असणे आवश्यक असेल अशा संथा अनुदानाकरिता पात्र असतील , तसेच सदर संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक असेल .

याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक असेल , पात्र अर्जांची छाननी त्रुटींची पूर्तता गोसेवा आयोग स्तरावर केले जातील . सदरचे अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे संबंधित संस्थेच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये वर्ग केले जातील .

या बाबत सविस्तर GR DOWNLOAD करण्यासाठी Click Here

Leave a Comment