@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna 3rd installment ] : राज्य शासनाकडून महिलांना सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दोन हप्ते अदा करण्यात आले आहेत , तर सदर योजनेअंतर्गत तिसरा हप्ता दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेली आहे .
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ज्या महिलांनी सदर योजनेअंतर्गत अर्ज सादर केले आहे व ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत . अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सदर योजनेअंतर्गत पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे .
ज्या महिलांचे नव्याने अर्ज मंजूर झाले आहेत ,अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै , ऑगस्ट , सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे एकूण चार हजार पाचशे रुपये खात्यात जमा होतील . तर ज्या महिलांना सदर योजनेअंतर्गत जुलै , ऑगस्ट असे तीन हजार रुपये प्राप्त झाले आहेत , अशांना केवळ सप्टेंबर महिन्याचे 1500/- रुपये खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत .
पुढील महिन्यामध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार असल्याची संभावना असल्याने , राज्य सरकारकडून सदर योजने अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येत आहेत .
दिनांक 29 सप्टेंबर 2024 पासून सदर लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे . यामुळे लाडकी बहिणींना निवडणुकीच्या पूर्वीच सदर योजनेअंतर्गत आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे .
- शेअर मार्केटमध्ये तेजी कधी येणार ? जाणून घ्या मार्केट तज्ञ , मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ; मार्केट आणखीन घसरण्याचा अंदाज !
- राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..
- पुढील 48 तासात राज्यातील “या” जिह्यात , वाऱ्यासह पावसाची शक्यता !