@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ nukasan bharapai madat nidhi shasan nirnay ] : विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांन सन 2022 च्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टी निकषाबाहेरील झालेल्या नुकसान भरपाईकरीता मदत निधी जाहीर करणेबाबत , राज्य शासनांच्या महसुल व वन विभाग मार्फत दिनांक 10.09.2024 रोजी GR निर्गमित झालेला आहे .
सदर जीआर नुसार , सन 2022 च्या पावसाळी हंगाम मधील सतत पडणाऱ्या पावसांमुळे अतिवृष्टीच्या निकष बाहेरील झालेल्या पिकांच्या नुकसानीकरीता राज्य शासनांच्या महसुल विभागाच्या दिनांक 20.06.2023 रोजीच्या निर्णयानुसार , राज्यातील पुढे नमुद करण्यात आलेल्या चार जिल्ह्यांकरीता एकुण 48094.60 लक्ष इतका निधी वितरण करण्यास राज्य महसुल विभागांकडून मंजूरी दिली गेली आहे .
यांमध्ये अहमदनगर , परभणी , वाशिम , अमरावती या चार जिल्ह्यांना 61672.08 लक्ष इतकी रक्कम वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . सदर चार जिल्हानिहाय वितरीत करण्यात आलेली निधी पुढीलप्रमाणे आहे .
अ.क्र | जिल्ह्याचे नाव | वितरीत निधी ( रुपये लक्षमध्ये ) |
01. | अहमदनगर | 30199.31 |
02. | अमरावती | 12977.42 |
03. | परभणी | 15277.75 |
04. | वाशिम | 3217.60 |
वरील तक्यांमध्ये नमुद केल्याप्रमाणे मदत निधी वितरीत करण्यात आलेली आहे , सदरचा निधी हा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , वाटप करण्यात आलेल्या लाभार्थीचे नाव व नीतीचा तपशील आपल्या संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटवर पब्लिश करण्याची निर्देश देण्यात आले आहेत .


- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !