@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ crop insurance complaint apps] : पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे पिकांची नुकसान झाले असल्यास , सदर नुकसान भरपाई करिता तक्रार 72 तासांत ऑनलाइन ॲप्स च्या माध्यमातून नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे , सदर ॲप्सच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार 72 तासात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना नोंदविता येणार आहे .
सध्या राज्यामध्ये अतिवृष्टी तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे . याकरिता राज्य शासनाकडून पंचनामे करण्याची आदेश प्रशासनास दिले असून , नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना देखील मोबाईलच्या माध्यमातून तक्रार प्रशासनाकडे नोंदविता येणार आहे . तक्रार नोंदवल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे केली जाईल व नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाईल .
याकरिता शेतकऱ्यांनी प्लेस्टोरच्या (Play Store ) माध्यमातून क्रोप इन्शुरन्स ( Crop Insurance ) हे ॲप्स डाऊनलोड करून त्या माध्यमातून पीक नुकसान ( क्रॉप लॉस ) या पर्यायचा निवड करून, त्यामध्ये मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकावा . त्यामध्ये खरीप हंगाम , वर्ष 2024 योजना आणि राज्य निवडून त्यामध्ये नोंदणीचा स्त्रोत सीएससी ( CSC ) अशा प्रकारे निवड करून आपल्याकडील पॉलिसी नंबर आहे का , त्या ऑप्शन समोरील बटन क्लिक करावे . आणि विमा पावती क्रमांक टाकून डन ( Done ) करावे , त्यामध्ये आपले पावती नंबरचा तपशील दिसेल .
त्यामध्ये घटक क्रमांकामधील पिकांची तक्रार करायची आहे अशा प्रकारचा ऑप्शन निवडावा त्यामध्ये घटनेचा प्रकार इत्यादी तपशील निवडून बाधित पिकांचा फोटो सबमिट करावा . त्यानंतर आपली तक्रार यशस्वीरित्या प्रशासनाकडे दाखल होईल याची तक्रार आयडी जतन करून ठेवावे.
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !