@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Will the retirement age of state employees be 60 years? ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार का असा सवाल कर्मचाऱ्यांमध्ये पडत आहे . कारण सध्या सोशल मिडीयामध्ये याबाबत सकारात्मक वृत्त पाहायला मिळत आहेत .
निवृत्तीचे वय : आपणांस माहितीच आहे कि , केंद्रीय कर्मचारी तसेच देशातील इतर 25 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे इतके आहे . तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय का वाढविले जात नाहीत ? असा सवाल राज्य कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होत आहे .
सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत राज्य कर्मचारी संघटनांमार्फत वेळोवेळी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत . तरी देखिल याची दखल घेतली जात नाही . निवडणुकीपुर्वी तत्कालीन राज्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले होते .
यावर समितीचे गठण देखिल करण्यात आले होते . परंतु सत्ता स्थापनेनंतर याचा सरकारला विसर पडला आहे . यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसुन येत आहे.
निवृत्तीचे वय वाढविण्याची आवश्यकता : सध्या स्पर्धेच्या युगांमध्ये सरकारी नोकरी मिळविण्यासाठी वयाचे 28 वर्षे निघून जात आहेत . यामुळे नियुक्तीनंतर कमी कालावधीची सेवा मिळत आहे .
परिणामी नविन पेन्शन प्रणाली ही सेवा कालावधीवर आधारीत असल्याने , एकीकडे कमी सेवा व निवृत्तीनंतर पेन्शनची देखिल हमी नाही . याशिवाय अनेकांना पदोन्नतीची संधी 01 , 02 वर्षामुळे हुकते . यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढविणे आवश्यक आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय रजेची वैशिष्ट्ये – अर्जित रजा ( नियम 50 ) ; जाणून घ्या सविस्तर !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर !
- मोदी सरकार मार्फत सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना दोन मोठे गिफ्ट ; जाणुन घ्या सविस्तर ..
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार का ? जाणुन घ्या अपडेट !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.20.11.2025 रोजी निर्गमित आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)