दिनांक 01 ते 07 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा – हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची माहिती !

Spread the love

@marathiprasar वैशाली पवार प्रतिनिधी [ Warning of unseasonal rains in the state from 01 to 07 April – Information from weather expert Punjabrao Dakh. ] : दिनांक 01 ते 07 एप्रिल या काळात राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे .

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार , राज्यात पुढील महिन्यापासुन अवकाळी पावसाची मोठी शक्यता असल्याने , दिनांक 31 मार्च पर्यंत शेतातील पिके काढून घेण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे .

भाग बदलुन अवकाळी पावसाची शक्यता : दिनांक 01 ते 07 एप्रिल 2025 या काळात पाऊस हा भाग बदलुन पडणार आहे, म्हणजेच आज या भागात तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागात तर तिसऱ्या दिवशी तिसऱ्या भागात असा भाग बदलुन पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : वरिष्ठ / निवडश्रेणी बाबत , शिक्षकांना कळविणे संदर्भात महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

कोणत्या भागात पडणार अवकाळी पाऊस : कोकण किनारी भागात जास्त मोठ्या प्रमाणात गारपिटीसह पाऊस पडणार आहे , त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार आहे , तर उर्वरित राज्यात भाग बदलुन पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

 सदरचा पाऊस हा सुरत पासुन पुढे सरकत कोल्हापुर पर्यंत अवकाळी स्वरुपात बसणार आहे .या काळात द्राक्ष , फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत .

Leave a Comment