@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ The Meteorological Department has warned of unseasonal rains in these districts of the state in the next 48 hours. ] : राज्यात पुढील 48 तासात काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे . यांमध्ये राज्यातील कोणत्या भागांना पावसाचे संकेत आहेत , ते पुढील प्रमाणे जाणून घेवूयात .
सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने , राज्यात पावसाचे वातावरण तयार झाले आहे , यांमध्ये वादळी वारे ताशी 30 ते 40 किमी वेगाने अवकाळी पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेली आहे .
पुढील 48 तासात या जिल्ह्यांना पावसाचा इशारा : नाशिक , पालघर , रायगड , ठाणे , मुंबई , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , तसेच विदर्भातील वर्धा , नागपुर , गडचिरोली , भंडारा , गोंदिया , यवतमाळ , अकोला , वाशिम ,बुलढाणा , चंद्रपुर , अमरावती या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
यामुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . नाशिक करांना द्राक्षे , डाळिंब , भाजीपाला पिकांवर काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यंदा मान्सुन लवकरच : यंदाच्या वर्षी मान्सुन हा दरवर्षी पेक्षा 01 दिवस अगोदरच येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे . यंदा राज्यात मान्सुन 06 जुन रोजी पोहोचणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !