राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताचा सर्वात मोठा ‍दिलासादायक शासन निर्णय निर्गमित ; GR दि.28.03.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ The biggest comforting government decision for state employees has been issued; GR dated 28.03.2025 ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत दिलासादायक महत्वपुर्ण शासन निर्णय राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 28.03.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( GPS ) योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता द्यावयाच्या विकल्पाच्या कालावधीमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

याबाबत सविस्तर निर्णय असा कि , राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनांकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये सहभाग घेण्याकरीता दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत विकल्प नमुना भरुन देण्याच्या सुचना वित्त विभागाच्या दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुचना देण्यात आलेले आहेत .

सदर कालावधीमध्ये वाढ करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी 01 वर्ष म्हणजेच दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे .

हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 620 रिक्त जागेसाठी महाभरती !

यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन विकल्पासाठी 01 वर्षाचा कालावधी मिळणार आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनातील सर्व बाबींचा अभ्यास करुन पेन्शन विकल्प भरता येणार आहे .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment