शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ TET exam must be passed by 31.08.2026. ] : टीईटी परीक्षा संदर्भात आत्ताची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे . सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे . यामुळे यामध्ये राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही अशी  बाब राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे . फक्त पुनर्विचार याचिका दाखल करु शकतो .परंतु याकरीता विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात आला होता .

विधी व न्याय विभागाचा अभिप्राय : सर्वोच्च न्यायालयाने सदर निकाल देण्यात आला असल्याने , यावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करु शकत नसल्याचा अभिप्राय राज्याचे विधी व न्याय विभागाने दिला आहे . याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री यांनी गुरुवारी विधानभवनात माहिती दिली आहे .

याबाबत विभानभवनात काँग्रेसचे नितीन राऊत , अस्लम शेख , अमीन पटेल यांनी सभात्याग केला . तर आमदार विक्रम काळे यांनी सांगितले कि , सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता यांचे कायदेशिर मत घेण्यात यावे .

संघटना मार्फत विविध याचिका दाखल करण्यात आलेली आहे . परंतु राज्य सरकारने केलेल्या याचिकाचा अधिक प्रभाव पडतो . असे विक्रम काळे यांनी सुचित केले .

Leave a Comment