@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state pensioners big update Shasan Nirnay ] : राज्यातील निवृत्तीवेतनधारक , त्याचबरोबर कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या बाबतीत वयाचा पुरावा म्हणून सादर करायचे कागदपत्र बाबत , राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण GR दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित झालेला आहे .
UIDAI यांच्याकडील दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजीच्या परिपत्रकामध्ये कर्मचारी भविष्य निधी संघटन यांचा दिनांक 16 जानेवारी 2024 च्या परिपत्रकामध्ये जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करावयाच्या यादीमध्ये आधार कार्डाचा वापर वगळण्याची बाब नमूद करण्यात आहे . सदर परिपत्रकामध्ये सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचारातील होती , तर सदर वित्त विभागाच्या दिनांक 10 ऑक्टोबर रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार शुद्धिपत्रक काढण्यात आलेला आहे .
सदर शासन शुद्धिपत्रकानुसार नमूद करण्यात आली आहे की , आधार कार्ड किंवा पॅन कार्ड शब्द ऐवजी जन्मदाखला , पॅन कार्ड, पारपत्र, मतदान ओळखपत्र ,बँक खाते असलेल्या बँक शाखाप्रमुखाचे प्रमाणपत्र , सेवा पुस्तकातील नोंद, शासकीय / निमशासकीय आस्थापनांचे प्रमाणपत्र , सेवानिवृत्त झालेल्या कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र त्याचबरोबर भारतीय जीवन विमा (LIC ) कंपनी अथवा अन्य विमा कंपनी यांच्याकडून पॉलिसी तसेच वाहन परवाना यांचा अंतर्भाव करण्यात यावा असे नमूद आहे .
तर सदर शासन निर्णय दिनांक 23 मार्च 2015 निर्णयातील मुद्दा क्रमांक 02 वगळण्याचे निर्देश दिले आहेत , तसेच सदर शासन निर्णय (GR ) मधील मुद्दा.03 मधील पहिल्या ओळीतील आधार कार्ड अथवा पॅन कार्ड या शब्दाऐवजी पॅनकार्ड सह वरील नमूद करण्यात आलेल्या यादीमधील (List ) अन्य कोणतेही दस्ताऐवज यांचा अंतर्भाग करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर निर्णय राज्यातील 80 वर्ष व त्यावरील निवृत्तीवेतनधारक त्याचबरोबर कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना सादर करायचा वयाचा पुरावा म्हणून कागदपत्रांमधून आधार कार्ड चा वापर वगळणे संदर्भात बाब नमूद करण्यात आली आहे .