राज्य कर्मचारी / निवृत्तीवेतनधारकांना आता एक काल्पनिक वेतनवाढ मिळणार ; वित्त विभाग मार्फत GR निर्गमित !

Spread the love

@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ State employees will now get a hypothetical salary increase ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना आता एक काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे . याबाबत वित्त विभाग मार्फत अधिकृत्त GR देखिल निर्गमित करण्यात आला आहे .

न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढीचा लाभ अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै व जानेवारी या महिन्यांमध्ये पगारवाढ दिली जाते .

वेतनवाढीकरीता काही नियमावली वित्त विभाग मार्फत निर्गमित आहेत . यांमध्ये दिनांक 19.12.2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारणा करण्यात आली आहे .

काल्पनिक वेतनवाढ : न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक 30 जुन रोजी निवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढीचा लाभ अनुज्ञेय आहे . याच धर्तीवर दि.01 जानेवारी रोजी वेतनवाढीचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकरीता ..

31 डिसेंबर रोजी निवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याकरीता वित्त विभाग मार्फत दिनांक 28.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सुचनांप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

काल्पनिक वेतनवाढ कोणास मिळणार ? : दिनांक 30 जुन रोजी निवृत्त होणारे व दि.31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्यांना सदर काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे . पंरतु यांमध्ये 30 जुन रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास जुलैची वेतनवाढ अनुज्ञेय असणे आवश्यक असेल , तर दि.31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांस जानेवारीची वेतनवाढ अनुज्ञेय असणे आवश्यक असेल .

Leave a Comment