@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees get 10 days paid leave for this work every 3 years; Know the government decision of the Finance Department ] : राज्य कर्मचाऱ्यांना वर्षातुन 10 दिवस खाली नमुद करण्यात आलेल्या प्रयोजनासाठी पगारी रजा अनुज्ञेय करण्यात येते . याबाबत वित्त विभागा मार्फत निर्गमित सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता ..
वित्त विभाग मार्फत दिनांक 27.06.2003 रोजी निर्गमित निर्णयानुसार , विपश्यना रिसर्च इन्स्टिट्युट धम्मगिरी इगतपुरी जिल्हा नाशिक या संस्था मार्फत राज्यातील केंद्रात विपश्यना शिबीर करीता 10 दिवसांची पगारी रजा राज्य कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय सदर शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे .
रजेचा उद्देश : विपश्यना शिबीर मध्ये ध्यान – धारणाचे प्रयोजन असते , ज्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय कामकाजात येणारे ताण – तणाव दुर करण्यासाठी सहाय्यभुत ठरते .सदर शिबिर केल्यानंतर कर्मचारी पुन्हा एकदा तणाव दुर ठेवून पुन्हा एकदा ताज्या दमाने काम करेल असा या रजेमागचा प्रमुख उद्देश आहे .
किमान 10 तर कमाल 14 दिवसांची रजा : सदर विपश्यना शिबिर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान 10 दिवसांची रजा तर कमाल 14 दिवसांची पगारी रजा मंजूर करता येते . सदर रजा ही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता मंजूर करता येत असते .
हे पण वाचा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दि.24.07.2025
सदरची रजा ही 03 वर्षातुन एकावेळेस तर संपुर्ण सेवा कालावधीमध्ये , जास्तीत जास्त 06 वेळा या मर्यादेत सदर प्रकारची रजा घेता येते . सदर रजा घेण्यासाठी प्रशिक्षणाचे प्रवेशपत्राची झेरॉक्स प्रति रजेच्या अर्जासह जोडणे आवश्यक असेल . सदरची रजा ही हक्क म्हणून मागता येत नसल्याचा नियम नमुद आहे .

- पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !
- गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !
- राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .