@marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee retirement age update ] : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात बदल होणार का ? या संदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे . या संदर्भात केंद्र सरकारच्या वरिष्ठ सभागृहामध्ये (राज्यसभेत ) एका सदस्याने प्रश्न उपस्थित केला होता , त्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे .
मीडिया रिपोर्टनुसार मागील काही दिवसापासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये बदल होणार ? अशा प्रकारची चर्चा सुरू आहे . या संदर्भात राज्यसभेचे सदस्य तेजविर सिंह यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता .
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या संदर्भात काही योजना तयार करण्यात येत आहेत का ? त्याचे परिणाम काय होतील ? अशा प्रकारचे तेजवीर सिंह यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते . यावर उत्तर देत केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की , अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सद्यस्थित विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे .
याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांना उशिरा निवृत्त व्हायचे आहेत , अशा कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून काही विशेष योजना आखली जाईल का ? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला होता . या प्रश्नाचे उत्तर देखील मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की , तशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सद्यस्थितीत अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले आहे .यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयासंदर्भात कोणताही बदल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत .
कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वयामध्ये आणखीन वाढ करण्यात यावी अशी मागणी होत आहे , ज्यामुळे जे कर्मचारी सेवेमध्ये उशिरा लागली आहेत अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !