केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही दि.01.07.2025 पासुन 3% महागाई भत्ता वाढ मिळणेबाबत ….

Spread the love

Marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta vadh nivedan patra ] : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 3 टक्के डी.ए वाढ लागु करणेबाबत राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे .

सदर निवेदन पत्रांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता देण्याचे सरकारचे धोरण आहे . त्या नुसार राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांना केंद्र सरकारप्रमाणे ….

वर्षांमध्ये 02 वेळा डी.ए वाढ दिली जाते . केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2025 पासुन 3 टक्के महागाई भत्ता वाढ झालेली असून , त्या नुसार त्यांची 55 टक्के वरुन 58 टक्के महागाई भत्ता वाढ झालेली आहे .

परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ अद्याप देण्यात आलेली नाही . त्यासाठी दिनांक 08.10.2025 रोजीच्या पत्रानुसार सदर महागाई भत्ता वाढ दिपावली पुर्वी देण्याची विनंती देखिल सरकारकडे करण्यात आलेली आहे .सदर मागणीची सरकार मार्फत दखल घेण्यात आलेली नाही .

निवृत्तीवेतनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका .. PDF स्वरुपात व्हाट्सअप वर हवी असल्यास 100/-  रुपये मध्ये आणि जर ,घरपोच  पोस्टाने हवी असल्यास, 380/- रुपयात मिळेल .. लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

तरी राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांना केंद्र सरकार प्रमाणे दि.01.07.2025 पासुनचा 3 टक्के डी.ए वाढ तात्काळ थकबाकीसह तात्काळ मंजूर करण्याची विनंती राज्य सरकारी गट ड ( चतुर्थश्रेणी ) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र संघटना मार्फत करण्यात आलेली आहे .

Leave a Comment