@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आचारसंहितापुर्वीच काल दिनांक 16 मार्च 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये विविध 17 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत , सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेले 17 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय :
- तात्पुरत्या स्वरुपामधील ( कंत्राटी तत्वावरील ) 64 अधिकाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात येणार ..
- राज्याच्या शिखर संस्थाच्या कळंबोलीतील इमारतीकरीता शुल्क माफीचा महत्वपुर्ण निर्णय ..
- आता यापुढे मालमत्ता विद्रुपीकरणकरीता 01 वर्षांचा होणार कारावास तर दंडाच्या रक्कमेमध्ये देखिल करण्यात आले वाढ ..
- 138 जलदगती न्यायालयांकरीता वाढीव खर्चास सदर मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली .
- राज्यात आता संस्कृत , गोर बंजारा , बंगाली , तेलगु साहित्य अकादमी स्थापन करण्यात येणार ..
- चित्रिकरण करीता आता शासकीय तसेच निमशासकीय जागा मोफत उपलब्ध करुन देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
- राज्यातील विणकर समाज करीता आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यास मंजूरी ..
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात मोठी वाढ करणेबाबत कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत मोठ निर्णय ..
- संगणक गुन्हे तात्काळ निकाली काढण्याकरीता , राज्यात सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविण्यास मंजूरी ..
- राज्यातील ऑटो रिक्षा तसेच टॅक्सी चालक यांच्या कल्याणाकारी मंडळास 50 कोटी इतकी रक्कम अनुदान देण्यास मंजूरी ..
- भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेनला जिमखान्याकरीता वाटप करण्यास मंजूरी ..
- राज्यांमध्ये संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणी करण्याकरीता , त्याचबरोबर गुन्ह्यांची वेगाने उकल करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
- राज्यातील वृद्ध साहित्यीक तसेच कलाकारांना 5 हजार रुपये मानधन देण्यास मंजुरी ..
- राज्यतील राजपत्रिक अधिकारी महासंघ यांच्या कल्याण केंद्र करीता 20 कोटी रुपये अतिरिक्त निधीस मंजूरी देण्यात आली .
- श्रीगोंदा तालुक्यामधील शेती महामंडळाची जमीन ही MIDC ला हस्तांतरीत करण्यास मंजूरी देण्यात आली ..