@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ST employee strike news ] : ऐन गणपती सणाच्या कालावधीमध्ये बस महामंडळ कर्मचाऱ्याकडून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे . यामुळे प्रवाशांची मोठी हाल दिसून येत असल्याने , प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्याकरिता धावपळी सुरू आहेत . कारण सणासुदीच्या कालावधीमध्ये बस महामंडळाला मोठा आर्थिक फायदा होत असतो , या काळातच बस बंद राहिल्यास, बस महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसेल , यामुळे प्रशासनाकडून मोठया हालचाली सुरू आहेत .
ST कामगारांच्या विविध मागण्याकरिता दिनांक 03 सप्टेंबर पासून कामगारांच्या तब्बल 11 संघटनांनी एकत्र येऊन संप पुकारला आहे . सदरचा संप राज्यव्यापी असून ,सद्यस्थितीमध्ये संपाची व्याप्ती अधिकच वाढली असून , राज्यभरात काही किरकोळ आगार सोडून उर्वरित ठिकाणी बस सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय कामगार संघटने कडून घेण्यात आला आहे .
गणपतीच्या सणामुळे प्रवाशाकडून बसचे आरक्षण केले आहेत , यामुळे जर बस सेवा सुरळीत न केल्यास प्रवाशांचा महामंडळावरचा विश्वास तुटेल , यामुळेच प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था म्हणून कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . याकरिता दिनांक 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून मनुष्यबळ देणाऱ्या संस्थेकडून इच्छुकता मागण्यात येत आहे .
याकरिता चालकाचे अवजड वाहन चालवण्याचा अनुभव (01 वर्षाचे ) असणे आवश्यक असेल , तसेच त्याच्याकडे पी.एस.व्ही . बॅच असणे आवश्यक असणार आहे . अशा चालकांची कंत्राटी पद्धतीने सेवा घेण्यात येणार आहे . यामुळेच काही अंशी बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचे , बोलले जात आहे .
बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या : बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा त्याचबरोबर वेतन देण्यात यावे . या प्रमुख मागणी करिता बेमुदत आंदोलन कर्मचाऱ्यांकडून पुकारले आहे . सदर आंदोलन दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 8.00 वाजेपासून सुरुवात करण्यात आली आहे . सदरचा संप बेमुदत असल्याने , प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या गैरसोयी होणार आहेत .
- शेअर मार्केटमध्ये तेजी कधी येणार ? जाणून घ्या मार्केट तज्ञ , मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ; मार्केट आणखीन घसरण्याचा अंदाज !
- राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..
- पुढील 48 तासात राज्यातील “या” जिह्यात , वाऱ्यासह पावसाची शक्यता !