Result : “या” दिवशी लागणार दहावी व बारावीचा निकाल ;

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू असून , सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे वेधली आहे . यातच महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी (SSC ) व बारावीचा ( HSC) निकाल जाहीर होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे .

माहे फेब्रुवारी व मार्च 2024 या महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा झाल्या असून , सदर परीक्षेचे पेपर तपासण्याची कामकाज शेवटच्या टप्प्यात आले आहेत . बोर्डाकडून निकाल तयार करण्यात येत आहेत  .राज्यात सद्यस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमुळे प्रशासनाची लक्ष निवडणूक कामी वेधले आहे . यातच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षेचे निकाल जाहीर होण्याची जवळपास तारीख निश्चित करण्यात आली आहे .

निकालाचे कामकाज शेवटच्या टप्प्यात असून इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील दिनांक 30 किंवा 31 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे . तर दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 02 किंवा 03 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे . यानंतर लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल दिनांक 4 जून 2024 रोजी लागणार आहे , त्यापूर्वीच दहावी व बारावीचा निकाल जाहीर होणार आहे .

दरवर्षी याच नियोजनाप्रमाणे बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येतो , परंतु लोकसभा निवडणुकांमुळे बोर्ड परीक्षेचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात होती . परंतु माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सदर निकालाचे नियोजन सांगण्यात आले आहे .

पुढील वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असल्याने , बोर्डाचे निकाल विहित कालावधीमध्ये जाहीर करणे अपेक्षित असल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट केले आहे , जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेता येईल .

Leave a Comment